• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अन्… गुलाबराव वाघ मला विचारूनच सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 29, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0
अन्… गुलाबराव वाघ मला विचारूनच सेनेच्या मेळाव्याला गेले : गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट !

जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव वाघ माझ्या भावासारखे आहेत. त्यांनी कायमच मला सहकार्य केलेय. सोमवारच्या मेळाव्यातही जाण्याबाबत त्यांनी मला विचारले होते, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांनी आज एका दैनिकाशी साधलेल्या संवादात आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी गुलाबराव पाटील याना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव आणि धरणगावच्या शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नाही, असेही श्री. पाटील म्हणाले. तसेच शिवसेनेतील मंत्र्यांची कामे होतात. मात्र, शिवसेनेच्या आमदारांची छोटी-छोटी कामे देखील होत नाहीत. यामुळे आमदार नाराज असल्याची माहिती पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र, पक्षप्रमुखांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. जर पक्षप्रमुख राज्यात फिरू शकत नाहीत. तर आदित्य ठाकरे यांनी राज्यात फिरून संघटनेचे मेळावे घ्यावेत असा ही सल्ला दिला. मात्र, आदित्य ठाकरेंनी देखील याकडे दुर्लक्ष केले. ८ महिन्यांपुर्वी संजय राऊत यांनाही आमदारांच्या नाराजीबाबत कल्पणा दिली होती. मात्र, तेव्हाही लक्ष दिले गेले नसल्यानेच आज ही वेळ शिवसेनेवर आली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे. दुसरीकडे याबाबत गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क साधला असता ते एका शिवसेनेच्या मेळाव्यात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतर वृत्त प्रकाशित करण्यात येईल याची वाचकांनी नोंद घ्यावी.

Previous Post

राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; राज्य निवडणूक आयोगाची

Next Post

Breaking : उध्दव ठाकरे यांची राजीनाम्याची घोषणा !

Next Post
Breaking : उध्दव ठाकरे यांची राजीनाम्याची घोषणा !

Breaking : उध्दव ठाकरे यांची राजीनाम्याची घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group