भविष्यात या रस्त्यावर दुर्दैवी घटना घडल्यास याल जबाबदार कोण ?
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव-पाळधी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरू आहे मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक जाम होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे.
जळगाव-पाळधी महामार्गावर पाळधी ते बांभोरी या रस्त्यावर एका रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक जाम होत आहे तर आज पहाटे रुग्णवाहिका देखील या रस्त्याच्या कामामुळे काही वेळ अडकून राहिली होती भविष्यात या रस्त्यामुळे अशी जर रुग्णवाहिका अडकून राहिली तर सर्वसामान्य रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ शकतो त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करून वाहतुकीला कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी वाहन चालक करत आहे. तर दुसरीकडे जो रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्याच्या साइड पट्टील खडी मोठ्या प्रमाणात पडले असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
सर्व्हिस रोड बंधनकारक
जळगाव – धरणगाव महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर प्रथम सर्व्हिस रोड करणे बंधनकारक असताना याठिकाणी कुठलाही रास्ता बनविण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. भविष्यात या रस्त्यावर दुर्देवी घटना घडल्यास याल जबाबदार कोण ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


