जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरात नुकतेच दि.२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवैध दारू विक्रेत्याने गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता एरंडोल तालुक्यातील कढोली गावात झालेल्या या गोळीबारात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कढोली गावातील हा तरुण एका खाजगी कंपनीत काम करत असून उद्या पारोळा येथे होणाऱ्या रथोत्सवासाठी तो आई-वडिलांसोबत गावी जाण्याच्या तयारीत होता. आज (दि. ३) दुपारी सुमारास चार वाजताच्या सुमारास तो घराच्या मागील बाजूस उभा असताना अचानक अज्ञात दिशेने गोळी झाडण्यात आली. गोळी थेट छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. तत्काळ त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणारे आरोपी हे जखमीच्या ओळखीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला असून नेमका प्रकार काय आहे याचा शोध सुरू आहे.


