Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसीत दारू विक्रेत्याकडून कामगारांवर गोळीबार
    क्राईम

    एमआयडीसीत दारू विक्रेत्याकडून कामगारांवर गोळीबार

    editor deskBy editor deskNovember 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोघे गंभीर जखमी; आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील विजेता इंडस्ट्रीज कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २ नोव्हेंबर) रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. या गोळीबारात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) अशी आहेत. दोघेही विजेता इंडस्ट्रीजमध्ये काम करीत असून, त्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी जी सेक्टर १४ मधील विजेता इंडस्ट्रीजमध्ये काम करणारा सरफू शेख हा रविवारी नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना कंपनीजवळील एका टपरीवर थांबला. त्यावेळी त्या ठिकाणी अवैध दारू विक्री करणारा चालक एका व्यक्तीस मारहाण करत होता. सरफू शेख याने ही घटना पाहताच दारू विक्रेत्याने त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

    या मारहाणीबाबत सरफू शेखने कंपनीत काम करणाऱ्या आपल्या भावांना, राजन शेख आणि अहेमद फिरोज शेख, यांना मदतीसाठी बोलावले. हे दोघे बाहेर आले असता, दारू विक्रेत्याने त्यांच्याशीही वाद घातला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्या विक्रेत्याला गावठी पिस्तूल दिले. त्यानंतर आरोपीने सलग चार ते पाच फायरिंग करून कामगारांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. गोळीबारात राजन आणि अहेमद हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवरही उपचार सुरू आहेत.

    घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी दारू विक्रेता व त्याला मदत करणारी महिला फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.