Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”
    चाळीसगाव

    “चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

    editor deskBy editor deskNovember 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निवडणूक प्रक्रियेत आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली जिल्ह्यात आघाडी..!

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षातर्फे चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता लागायची वाट पाहिली जात असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी यात आघाडी घेतली असून चाळीसगावमध्ये झालेल्या या मुलाखतींना उमेदवारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

    उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाशी असलेली निष्ठा आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला. नगरपालिका निवडणूक ही सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद आणि पक्षनिष्ठ लोकांच्या साथीने लढविण्याचा निर्धार आमदार मंगेशदादांनी यावेळी व्यक्त केला. “केलेल्या विकासकामांच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानेच आपल्याला नगरपालिकेत बहुमत मिळवायचे आहे आणि आपल्या चाळीसगाव शहराला उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक १ चे शहर बनवायचे आहे. विकास हाच आपला अजेंडा राहील” असे मंगेशदादा यांनी सांगितले.

    गेल्या तीन-चार वर्षात चाळीसगावचे रूप बदलले आहे, एक चांगली सकारात्मक ऊर्जा प्रत्येक चाळीसगाव वासियांच्या मनात आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात विकास निरंतर सुरू ठेवायचा असेल तर चाळीसगाव शहरातील विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व पूर्ण बहुमताने सत्ता येणे गरजेचे आहे, त्यासाठी आम्ही पहिली पसंती ही भारतीय जनता पक्षालाच दिली आहे. पक्षाने संधी दिली तर त्याचे सोने करू जर काही कारणाने पक्षाने संधी नाकारली तर दिलेल्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मंगेशदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावू असे अनेक इच्छुक उमेदवारांनी ठामपणे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026

    बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू

    March 12, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.