राज्याच्या राजकारणात नवीन हालचाली सुरू
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे ही तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. आज बैठकीत अजित पवार गैरहजर राहिले त्यामुळे अजित पवार यांच्यावर सर्वाचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या सर्वाधिक तक्रारी या अजित पवार यांच्याबाबत पक्षातून आहेत. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. या घडत असलेल्या प्रकरणात अडचणी प्रसंगी ते दोन तास सुरक्षेशिवाय गायब होते, असा खळबळजनक दावा महाविकास आघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत, असं फारच कमी वेळा घडलं आहे.
पण त्याआधी अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपचा हात दिसत नाही, असं वक्तव्य केलं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शरद पवारांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचं सांगत अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला होता. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजितदादांना दिसला नाही, अजित पवार कोरोना झाल्यामुळे सध्या क्वारंटाईन आहेत.