जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरासह पाचोरा तसेच सोयगाव तालुक्यांतून दुचाकी चोरणार्या शहापूर येथील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवार २० ऑगस्ट रोजी अटक केली आहे.
शुभम राजेंद्र परदेशी वय २१ दीपक सुनील खरे वय २२ शुभम शांताराम माळी वय २१ तिन्ही रा.शहापुर ता.पाचोरा अशी संशयितांची नावे आहेत. तिघांकडून सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी जळगाव जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील ,प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, दादाभाऊ पाटील, जयवंत चौधरी, गजानन पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, राहुल बैसाणे , अशोक पाटील, मुरलीधर बारी या कर्मचाऱ्यांचे पथक जिल्ह्यात ठिकठिकाणी रवाना केले होते. पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील महाविद्यालयीन तरुण दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने माहिती काढून शुभम परदेशी व दीपक खरे व शुभम माळी या तीन जणांना शुक्रवार २० ऑगस्ट रोजी अटक केली. त्यांनी जळगाव शहरातील रामानंदनगर, पाचोरा शहर तसेच सोयगाव ता.अौरंगाबाद येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान तिघे संशयित हे मित्र असून सोयगाव येथे फोटोशूट करण्यासाठी गेले असताना या ठिकाणी त्यांना काही दुचाकी पसंत पडल्याने त्या दुचाकीही संशयितांनी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.