मुंबई वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर या सर्व प्रकारात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर स नवीन वळण लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले नंतर आसामच्या गुवाहटीला मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची विचारधारा थोडीशी वेगळी आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजीनामा न देता बहुमत चाचणीला सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार बैठक अशी चर्चा सुरू झाली.