लाईव्ह महाराष्ट्र न्यूज मुंबई– मंत्री आणि बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीत बंडखोर आमदारांशी संवाद साधत शिवसेनेचे नेते संजय राऊताना सडेतोड टीका केली. सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादमुळे या पदापर्यंत पोहचलो. कार्यकर्त्यांच्या वेळीप्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत असतो असा टोला लगावला आहे.
आपण सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहोत. आपल्या सर्वांवर जिल्ह्यातून विविध आरोप चालू आहे. तसेच आपल्या पाठीशी देखील अनेक लोक उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही पानटपरीवर बसवू, असं संजय राऊत म्हणाले. मात्र त्यांना पानटपरीवर चुना कधी लावून जाईल हे त्यांना कळणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले, पण शरद पवारांना काही सोडायला तयार नाहीत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाहीय का? संजय राऊतांना काही माहित आहे का, १९९२च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांनी ४७ डिग्री सेल्सियस तापमानात जळगावमध्ये येऊन ३५ लग्न लावावे, मी बहाद्दर समजून घेईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.