


जळगाव : प्रतिनिधी
घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेले असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) धानवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील धानवड येथील भिकन शंकर पाटील (६२) हे २३ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या स्लायडिंग खिडकीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. शोकेसच्या लॉकरमधून रोख ४० हजार रुपयांसह २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण ६६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोऊन नेला. पाटील कुटुंबीय २६ ऑक्टोबर रोजी घरी आले त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भिकन पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. प्राप्त फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहेत.


