मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांनी पाठींबा दिला आहे. बैठक आटोपल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी तातडीने आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेवून मुंबईत दाखल झाले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना थेट सवाल करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीला बहूमत सिध्द करावे लागणार आहे.
या सर्व घडामोंडीनंतरही मुख्यमंत्री बंडखोर झालेल्या आमदारांना उद्धव ठाकरे आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी सवाल उपस्थित केला आहे. साऱ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुढील घडामोडींचा विचारविनिमय करण्यासाठी तातडीने आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर ही बैठक सुरु होत आहे. राजीनामा द्यावा की बहुमत प्रस्तावाला सामोरे जावे यामध्ये उद्धव ठाकरे संभ्रमात अडकल्याचे बोलले जात आहे.