मुंबई वृत्तसंस्था । राज्यात महाविकास आघाडीविरोधात सुरू असलेल्या राजकरणात भाजपा फायदा उचलून बंडखोर आमदारांसोत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरू आहे. यातच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठक झाल्यानंतर भाजपा वेट ॲण्ड वॉच या भूमीकेत असून सध्या कोणत्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या ४० आमदार असून अजून काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या शक्यता आहे. यात उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील असे बडे नेते शिंदे गटात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पडून नवं सरकार स्थापन होई अशीही चर्चा आहे. यामध्ये भाजप या सर्वाचा फायदा घेऊन नवं सरकार स्थापन कऱण्याचीही दाट शक्यता आहे. याबाबतच बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना सध्यातरी असा कोणताही निर्णय़ भाजपने कोअर कमिटी बैठकीत घेतलेला नाही. तसंच कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले असून गरज पडल्यास पुन्हा कोअर टीमची बैठक घेऊन आम्ही निर्णय़ घेऊ, असंही ते म्हणाले.