जळगाव प्रतिनिधी । बंडखोर आमदार लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातले ५ आमदारांचा समावेश आहे. यात चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांचाही समावेश असून त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने अपात्र करण्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे.
आमदार लताबाई सोनवणे यांच्या जळगाव शहरातील निवासस्थानी रविवारी सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.