Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उद्धव ठाकरेंनी दिल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा
    राजकारण

    उद्धव ठाकरेंनी दिल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा

    editor deskBy editor deskOctober 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून राजकीय क्षेत्रात देखील भाषणबाजी सुरु आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.

    नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार राजकीय धक्के बसत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, तुम्ही सर्वजण एका चांगल्या दिवशी आला आहेत. आज नरक चतुर्दशी आहे. आज नरकासुराचा वध झाला. आत्ता हा नरकासुर कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलात. आता हा प्रवास सुरू झाला आहे.

    आजपर्यंत जे मतचोरी करून तिकडे बसले होते, त्यांना वाटले होते की, त्यांची चोरी कुणी पकडू शकणार नाही. पण त्यांची चोरी चोरासकट आपण पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसांसोबत अमराठी माणसेही एकत्र आली आहेत. एकत्र येत आहेत. देशात कुणालाही हुकूमशाही नको आहे. आपला महाराष्ट्र नेहमी लढणारा आहे. आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात. पण तुम्हाला काही खोकेबिके मिळालेत का? हे सांगा. काही धाकदपटशहा आहे का? तुमच्या मागे काही एजन्सी लागली आहे का? काही नाही. शेवटी लालुच दाखवून घेतलेली माणसे आणि घाबरून पक्षांतर करणाऱ्या नेभळट माणसांपेक्षा हे कट्टर निष्ठावंत लोक शिवसेनेत येत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पापाचे धनी होण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, मी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की, आपण काय करत आहात आणि कोणते विषय पोसत आहात याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा. इतिहासात आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच दिवाळीच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा व विनंती करत आहे. यावर जास्त बोलण्याची गरज नाही. नाशिकमध्ये मी एकदा आलो होतो. आता मी तिकडे पुन्हा येईन. पण येईन तेव्हा मी भगवा फडकवूनच येईन. हा भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आरोग्य देवो ही प्रार्थना करतो, तुमचे सर्वांचे शिवसेनेत स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.