नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पिटीशन दाखल करण्यात आले. दरम्यान या आमदारांना नोटीसा बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज ना उद्या त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा हे सरकार टिकणार नाही असे बोलले जात होतं. दरम्यान, आम्ही हे अडीच वर्षे सरकार चालविलं आहे. अजूनही सरकार चालेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बंडखोर आमदार आल्यावर याचा अंदाज येईल. असे सांगितले. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई होईल का असा सवाल पत्रकारांनी केला असता, ते म्हणाले की, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. ते घेतली. आज किंवा उद्या कधीतरी घेतली असा सुचक विधान त्यांनी केले.
गुजरात आणि आसाम राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेवून गेले आहे. या प्रकरणात भाजत कुठपर्यंत आहे हे मला सांगता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.