मुंबई वृत्तसंस्था । शिंदे गटावर वारंवार प्रहार करणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिंदे गटाने एका वृत्तवाहिनीला दिले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे राजकीय नाट्य गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणाताही ठोस निर्णय न घेतल्यास शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटावर प्रहार करत आहे. दरम्यान, त्यांचे सख्खे भाऊ सुनील राऊत हे शिंदे गटाच्या संर्कात असल्याची धक्कादायक माहिती ‘न्यूज18’ ला दिली आहे. ते देखील गुवाहटी येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारलं आहे. या बंडात सुरुवातीला 20 ते 25 आमदार होते. त्यानंतर हळूहळू इतर आमदार शिंदे यांच्या गोटात जावून मिळाले. शिंदे यांचा आमदारांचा गट हा आसामच्या गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये थांबला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक दिग्गज नेते या बंडात सहभागी झाले आहेत. बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार प्रहार करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे.