धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव-सोनवद रोड परिसरातील रहिवासी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आकर्षक बातमी आहे. मौजे धरणगाव शिवारात गट नं. २७८ येथे ‘जगदंबा डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स’तर्फे ‘जगदंबा नगर’ या नावाने संपूर्ण सुविधांनी सुसज्ज सरकारमान्यताप्राप्त (N.A.T.P.) लेआऊटचे धन्वंतरी त्रयोदशीच्या (धनोत्रयोदशी) शुभमुहूर्तावर प्लॉट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
‘श्री स्वामी समर्थ’ यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रकल्पाकडे भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. ‘जगदंबा नगर’मध्ये आधुनिक आणि सुरक्षित जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या लेआऊटच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण लेआऊटला एकच मुख्य प्रवेशद्वार असून, सुरक्षिततेसाठी पूर्ण वेळ सेक्युरिटी सुविधा पुरवण्यात आली आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी प्रशस्त आणि मजबूत काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले आहेत. पाणी आणि सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून अंडर ग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची व्यवस्था आणि घर बांधकामासाठी कॉमन विहिरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय, संपूर्ण लेआऊटला वॉल कंपाऊंड असल्याने सुरक्षा वाढली आहे. ‘जगदंबा नगर’मध्ये विशेषतः वास्तुशास्त्र पद्धतीनुसार प्लॉटची मांडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे निवासींना सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी लाभेल, असा विश्वास डेव्हलपर्सनी व्यक्त केला आहे.
आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास, येथे प्लॉट बुकिंग करणे अत्यंत सोपे आहे. केवळ ५१ हजार रुपये भरून बुकिंग करता येणार असून, ग्राहकांसाठी बँक लोन सुविधा देखील उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ११ महिन्यांच्या दीर्घ मुदतीवर प्लॉट खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. प्लॉटसोबतच, जे ग्राहक त्वरित घर बांधण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी 1BHK आणि 2BHK प्रिमीयम रो-हाऊसचे बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वाल्मीक पाटील (मो. ९४२३५८०५३४), राजेंद्र पाटील (मो. ७७७५०७४६१७), आणि संदीप पाटील (मो. ९७६७४८०४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ‘जगदंबा डेव्हलपर्स’तर्फे करण्यात आले आहे.