जालना वृत्तसेवा । राज्यात बंडखोरीचे राजकारण सुरू झाल्याने मविआ सरकार अस्वस्थता पसरली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात सक्रीय झाल्यावर राज्यात नवीन सरकार येणार असल्याचा सुचक विधान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजपतर्फे अतिशय सावध भूमिका घेण्यात आली आहे. भाजपच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याबाबत विधान केलेले नाही. शिंदे यांचे बंड हा शिवसेनेता अंतर्गत प्रश्न असल्याचे आजवर विविध नेत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुप्त भेटीगाठी घेत असले तरी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची एकत्र भेट झाली असून यात सत्ता स्थापनेचे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज जालन्यातील एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आम्ही फक्त दोन-तीन दिवसच विरोधी पक्षात राहणार असून आमचे राज्यात लवकरच सरकार येणार आहे.