मुंबई वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी करून शिवसेनेच ४१ आमदारांसोबत गुवाहाटीला रवाना झाले आहे. या राजकरणात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाकी पडले असल्या. त्यांच्या साथीला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी जोरदार आघाडी घेतली असून बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संवाद साधून मन वळविण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे राजकरण डगमगाला लागली आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पतीच्या राजकरणात हाताला हात धरून आघाडी घेतले आहे. रश्मी ठाकरे ह्या बंडखोर आमदारा व मंत्र्यांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांची मन वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे. तर काही बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ आहे आणि विश्वासदर्शक ठराव झाल्यास बहुमत १४४ आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीला १६९ जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाने भाजपला पाठींबा दिल्याने ठाकरे सरकार कोसळेल.