चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील अग्रगण्य अश्या पिंपळवाढ म्हाळसा सहकारी दूध उत्पादक सोसायटीच्या वतीने आज दूध उत्पादकांना माझ्याहस्ते बोनस वाटप शुभारंभ करण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा दूध संघाच्या वतीने 50 पैसे व सोसायटीच्या नफ्यातून 50 पैसे असे एकूण 1 रुपये प्रतिलिटर बोनस देण्यात येत आहे. आपल्या नफ्याचा वाटा शेतकऱ्यांना देण्याचा पिंपळवाड म्हाळसा सोसायटीचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान त्यांनी केला आहे.
व्यवस्थापन पारदर्शक असेल, सदस्य एकदिलाने काम करत असतील आणि शेतकऱ्यांचा हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला जाईल तर प्रत्येक सोसायटी अशाच पद्धतीने आत्मनिर्भर बनेल हा आम्हाला विश्वास आहे. जिल्हा दूध संघाचा चेअरमन या नात्याने जिल्ह्यातील प्रत्येक दूध उत्पादकाला प्रोत्साहन मिळावं, त्यांना योग्य दर मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.


