Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विधानसभेत जिंकून देतो म्हणत महिला नेत्याला मागितली ३० लाखांची खंडणी !
    क्राईम

    विधानसभेत जिंकून देतो म्हणत महिला नेत्याला मागितली ३० लाखांची खंडणी !

    editor deskBy editor deskOctober 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    येथील भाजपच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची भाषा केली. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याची आक्षेपार्ह बनावट क्लिप तयार करुन सोशल मीडियावर टाकेल, तसेच इन्कमटॅक्स, सीबीआय, इडी यांच्याकडे तक्रार करेल, अशी धमकी देवून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

    तसेच पैसे न दिल्यास समाजामध्ये तुमची, कुटुबांची बदनामी करेल, तुमच्या गाडीत ड्रग्स ठेवुन बदनामी करेल, अशीही धमकी दिली. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास पो.नि. राहुलकुमार पवार करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.