मुंबई वृत्तसेवा । शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ उपनेते मंत्री गुलाबराव पाटील हे देखील सकाळ पासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. गुलाबराव पाटील यांनी आधी समर्थकांना जय महाराष्ट्र पाठवलं आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले आहेत.
या मुळे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आधी एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित राहिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत असल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपकडून सत्तेची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारची धाकधुक वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते.