जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वावडदा येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री यांचे पुत्र मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्सेस या दालनाचा फित कापुन शुभारंभ करण्यात आला .
यावेळी प्रतापराव पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात जलदगतीने सेवा देण्यासाठी एकाच छताखाली I S I कंपनीने ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पी.व्ही.सी.पाईप, रासायनिक खते,बि-बियाणे, किटकनाशक औषधे तसेच नामांकित टिशु कल्चर केळीचे रोपे,खरबुज, टरबुज रोपांची बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले . तसेच फॉर्चुन ठिबक कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील भुरे, रासायनिक खत कंपनीचे किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, शिवसेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कापडणे, शिवसेना शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि के पाटील, माजी शेतकी संघ चेअरमन अर्जुन पाटील, शिवसेना जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव वराडे,शिवसेना जळगाव तालुका उपप्रमुख संदिप सुरळकर,वावडदा माजी सरपंच अनिल पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील,जळके वि.का.सोसायटी माजी चेअरमन कविश्वर पाटील, प्रविण पाटील,सावखेडा सरपंच जितु भाऊ,लोणवाडी सरपंच बाळु धाडी, बबन दादा,कोमल दादा आण्णा गोपाळ,मोती आबा,आप्पा पवार,विकास जाधव ,उत्तम पाटील, धनराज पाटील,,दिपक पाटील,सागर ठोसरे , आप्पा राठोड व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले व श्री साई ॲग्रो सव्हिर्सेसचे संचालक चेतन मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले


