Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’च्या बातमीचा दणका; शाळेत मद्यपान करणारा शिक्षक अखेर निलंबित !
    धरणगाव

    ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’च्या बातमीचा दणका; शाळेत मद्यपान करणारा शिक्षक अखेर निलंबित !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना शाळेतच मद्यपान अवस्थेत आढळल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने कठोर कारवाई केली आहे. ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ने या गंभीर प्रकरणाची बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेऊन शिक्षकाला निलंबित केले आहे.

    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांच्या निर्देशानुसार, पंचायत समिती धरणगावच्या गट विकास अधिकारी यांनी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. सीईओ करनवाल यांनी या प्राप्त तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ही कारवाई केली आहे.

    नेमके काय घडले?
    दिनांक ६ ऑक्टोबर रोजी कवठळ येथील जिल्हा परिषद शाळा बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संतप्त ग्रामस्थांनी याबाबतची माहिती गट शिक्षण अधिकारी, धरणगाव यांना दिल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू झाली. केंद्र प्रमुखांनी संबंधित शिक्षक सोनवणे यांना नोटीस बजावली असता, ते शाळेत गैरहजर असल्याचे आढळले. या घटनेची गंभीर दखल घेत, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख चांदसर आणि केंद्र प्रमुख पाळधी यांनी ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन सखोल चौकशी केली.

    गंभीर तक्रारींची नोंद
    चौकशीदरम्यान, ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सहशिक्षकांनी शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांच्याविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित शिक्षक वारंवार मद्यपान करून शाळेत येत असत, तसेच ते वर्ग अध्यापन व्यवस्थित करत नव्हते आणि शाळेतून अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहत असत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने घटनेची दखल घेत, संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    एलसीबीची धडक कारवाई : धरणगाव – चोपडा रस्त्यावर सापडला गांजा !

    December 3, 2025

    “संचार साथी म्हणजे ‘पेगासस’च : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप”

    December 3, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.