मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगरमध्ये गुरूवारी (दि.९ ऑक्टोबर) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली होती. या सभेवेळी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं होतं. त्यांनी भातपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह आव्हाने दिली होती. त्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी वारीस पठाण यांच्या आव्हानावर प्रतिआव्हान देत तुम्ही फक्त जागा, वेळ किंवा मस्जिद कळवा असं म्हटलं. नितेश राणे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, कालची सभा ही अहमदनगरमध्ये नाही तर अहिल्यानगरमध्ये झाली आहे. भुंकाणारी कुत्री चावत नाहीत.
राणे पुढे म्हणाले, ‘ते अहिल्यानगरमध्ये येत वळवळ करत होते त्यांना अहिल्यानगर नाव मानायंच नाही हे कायदा सुव्यवस्था मानतो असं म्हणतात. हे काय पाकिस्तान आहे का? शरिया आहे का? ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ तयार झाली आहे ते भारताच्या स्वातंत्र्याचे विरोधक होते. आता तुमच्या सभा लावायच्या की नाही हे सरकार म्हणून बघावं लागेल. हिंदुत्ववादी सरकार आहे. जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर सभा होऊ द्यायची की नाही याचा विचार करावा लागेल.’
आय लव्ह मोहम्मदची पोस्टर लावता अन्….
आमच्या देवांबद्दल काही घडल्यावर आम्ही बोलायचं नाही का? सगळीकडं आय लव्ह मोहम्मदची पोस्टर लावून धमकवत असाल तर आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडावा लागेल. खरा सनातनी हा आंबेडकर यांना मानणारा आहे. शिवभक्ती भीमभक्ती मानणारा आहे. हिंदूत्ववादी कार्यकर्ता म्हणून पैजाम्याची नाडे कसे ढिले करायचं हे आम्हाला माहिती आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका असं देखील राणे म्हणाले.
वारीस पठाण यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल नितेश राणे म्हणाले, ‘वेळ, जागा, मस्जिद निवडा धमक्या देऊ नका, तुम्हाला माहीत नाही नितेश राणे चीज काय आहे. ही नसबंदीवाली पिल्लावळ आहे. हे लोकं नुसतं भुंकतात. राज्यातलं वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार सभेची परवानगी देतं आहे म्हणून बोलू शकता. नाहीतर मस्जिदीच्या भोंग्यातून बोलावं लागलं असतं. मूर्तीची विटंबना केली त्यावेळी एमआयएम बोललं नाही. आता यांना हैदराबादमार्गे पाकिस्तानला पाठवण्याचं काम करावं लागेल. आमचा सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. हिंदू सणात दगडं मारणं, गजवा हिंद ज्यांना करायचं आहे त्यांना आमचा विरोध आहे.


