मुंबई प्रतिनिधी । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २० आमदार नॉटरिचेबल असल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत आमची घुसमट होत असून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला मान्य नाही, भाजपा सोबत सरकार स्थान केलं जावं असा निरोप शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांना दिला आहे. दरम्यान, शिंदे यांना फक्त २० आमदार चालणार नाही तर त्यांना अजून १७ अमदारांची गरज लागणार आहे.
विधान परिषदेत शिवसेनेचे सचिन अहिर व शिवसैनिक आमश्या पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. विजयाच्या सेलिब्रेशनाआधीच शिवसेनेत मोठा भूकंप झाला. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले.
एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे सध्या २० आमदारांचंच बळ आहे. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना भाजप बरोबर जाण्याच्या निर्णयाआधी किंवा सेनेला धक्का देण्याआधी आणखी १७ आमदारांची गरज आहे. म्हणजेच आमदार शिंदे यांच्या पाठीमागे ३७ आमदारांचे पाठबळ लागेल.
अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त २० आमदार असून चालणार नाही तर शिंदेकडे आणखी १७ आमदार असणं आवश्यक आहे तरच ते पक्षांतर बंदीच्या कचाट्याचून वाचू शकतात. सध्या सेनेकडे ५५ आमदार आहेत. दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. म्हणजेच सेनेच्या ३७ आमदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर त्यांच्याविरोधात पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही.