Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोलच्या राजकीय क्षेत्रात खळबळ : सरपंच, सदस्यपतीने घेतला मोठी लाच !
    क्राईम

    एरंडोलच्या राजकीय क्षेत्रात खळबळ : सरपंच, सदस्यपतीने घेतला मोठी लाच !

    editor deskBy editor deskOctober 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शासकीय कंत्राटदाराला हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मागणीसाठी 80 हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचाने मागितली होती. जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जळगावच्या काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला व खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. या अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव सरपंच भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (38, युनियन बँकेजवळ, एरंडोल) व संतोष नथ्थू पाटील (49, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. या कारवाईने रिंगणगाव ग्रामपंचायतीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेत एक कोटी 50 लाख 23 हजार 321 रुपयांचे काम केले आहे व एक कोटी 27 लाख 23 हजार 321 रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे तर उर्वरीत 23 लाख रुपये प्रलंबित असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रकरण सादर केले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी सरपंच यांचा करारनामा अपूर्ण असल्याने देयक प्रलंबित होते. सरपंच भानुदास मते व सदस्य पती भानुदास महाजन यांची 6 ऑक्टोबर रोजी भेट घेतल्यानंतर त्यांनी हस्तांतरनामा देण्यासाठी एक लाखांची लाच मागिली व 80 हजार रुपये स्वीकारण्यावर तडजोड केली. 7 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचा इशारा केल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर सरपंच व सदस्य पतीला एसीबीकडे बेड्या ठोकल्या.

    यांनी केला सापळा यशस्वी
    हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योेगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.