लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात 57 वर्षे महिलेवर अतिजोखमीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. यासाठी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी देवकर रुग्णालयाचे आभार व्यक्त केले आहेत.
धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील श्रीमती सुनंदाबाई गोपीचंद पवार यांना गेल्या काही वर्षांपासून दृष्टीदोष होता. त्यामुळे त्यांना त्या डोळ्याने सर्वकाही अंधुक दिसत होते. त्यासोबतच त्यांना चालताना धाप लागणे, हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया ही अतिजोखमीची ठरणार होती. अशातच त्यांच्या कुटुंबीयांना देवकर रुग्णालयात सवलतीच्या दरात होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी त्यांना सोबत घेत देवकर रुग्णालय गाठले. या ठिकाणी त्यांच्या फिटनेससाठी सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यात त्यांना अति उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा समस्या समोर आल्या. अशा परिस्थितीत रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. म्हणून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेत या व्याधींवर उपचार सुरू केले. अवघ्या दोन दिवसांत त्यांचा रक्तदाब आणि हृदयविकार यावर गोळ्या औषधे यांच्या सहाय्याने नियंत्रण मिळविण्यात आले. आणि सुनंदाबाई यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय ठराविक दिवसांच्या अंतराने त्यांना बीपीवर हृदयविकाराच्या मोफत तपासणीसाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला देण्यात आला. आता सुनंदाबाई यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून, शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्याने त्यांना दिसू लागले आहे.
रुग्णालयाचे आभार
श्रीमती सुनंदाबाई पवार यांचे पुतणे गोरख पवार यांनी सांगितले, की आम्हाला रुग्णालयात सुरू असलेल्या मोतीबिंदू अभियानाची माहिती मिळाली आणि आम्ही थेट देवकर रुग्णालय गाठले. येथील सर्व सुविधा या पंचतारांकित रुग्णालयाच्या तोडीच्या सुविधा असून, रुग्णांची सेवा सुश्रुषा, पर्यावरणपूरक वातावरण यामुळे प्रसन्न वाटते. डॉक्टरांनी देखील आपुलकीने केलेले उपचार आणि नंतरच्या सर्व तपासण्या या आम्हाला अत्यंत सुखकारक वाटल्या. त्याबद्दल आम्ही रुग्णालयाचे आभार मानतो.
अत्यल्प दरात शस्त्रक्रिया
देवकर रुग्णालयाचे संस्थापक व जिल्हा बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या संकल्पानुसार रुग्णालयातर्फे अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात केवळ *2500 रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया* करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात रुग्णाच्या शस्त्रक्रिया व राहण्या – खाण्याचा खर्च समाविष्ट आहे. अत्यल्प दरातील या सुविधेमुळे जिल्हाभरातील मोतिबिंदूचे रुग्ण रुग्णालयात धाव घेत आहेत.
संपर्क : डॉ. नितीन पाटील
मो. 9370935454