जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे झाला सन्मान
धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात चमगाव येथील रहिवासी दीपक वसंतराव सोनवणे अमळनेर तालुक्यातील गडखांब केंद्रातील जि.प.शाळा देवगाव देवळी येथे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असून दीपक सोनवणे यांना जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी तालुक्यासह जिल्हाभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा “ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार २०२५ स्वामी विवेकानंद हॉल,जामनेर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
दीपक सोनवणे यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील जि.प शाळेत देखील त्यांनी सेवा केली आहे. याची दखल घेवून दीपक सोनवणे यांना यांची सन २०२५ च्या “जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे जिनियस मास्टर्स फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश कांतीलाल पाटील यांनी सांगितले.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष(पूर्व) चंद्रकांत बाविस्कर, जि.प. उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नगरपरिषद जामनेर मा.गटनेते प्रशांत भोंडे,पं.स.जामनेरचे मा.सदस्य अमर पाटील,बुलढाणा जि.प.चे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकिशोर शिंदे, तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक,जिनियस मास्टर्स फाउंडेशन चे सर्व सदस्य व शिक्षक संघटनांचे, शिक्षक पतपेढीचे संचालक,पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


