जळगाव, प्रतिनिधी । शहरातील श्रीराम मंदिर संस्थातर्फे श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा साजरा करण्यात आली. विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे पंढरपूर करिता श्री संत मुक्ताबाई राम पालखी पायी वारी काढण्यात येते.
सोमवारी १३ जून रोजी जुने श्रीराम मंदिर येथून पालखी निघाल्यानंतर शहरातील संत अप्पा महाराज समाधी मंदिरातील मुक्कामानंतर मंगळवारी १४ जून रोजी सकाळी ८ वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात, तसेच विठ्ठल रुख्मिणी, विठोबा रखुमाई, जय जय रामकृष्ण हरीच्या नामघोष्यात पालखीचे निघाली. ही पालखी पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी, डिमार्ट, मेहरून बगीचा, जैन हिल्स मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्रीराम मंदीराचे गादीपती हरी भक्त पारायण मंगेश महाराज जोशी, जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासह भजनी मंडळ, वारकऱ्यांनी सहभागी झाले होते.