जामनेर : प्रतिनिधी
सोयगाव येथील दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णी येथून सोयगाव येथे जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यामुळे शेंदुर्णी शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव येथील दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णी येथून सोयगाव येथे जाणाऱ्या दोन दुचाकींची शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत शेंदुर्णी येथील ओम कॉम्प्युटरचे संचालक मनोज जोशी यांचा एकुलता एक मुलगा नचिकेत मनोज जोशी व विशाल अशोक सूर्यवंशी या दोन युवकांचे निधन झाले आहे. दरम्यान, नचिकेत जोशी हा १८ वर्षांचा तर अशोक सूर्यवंशी हा २५ वर्षाचा युवक होता. एवढ्या कमी वयात घरातील मुले अपघातात ठार झाल्यामुळे सर्व गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मागच्याच वर्षी विशाल सूर्यवंशी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. दसऱ्यानंतर व दुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या आधी झालेल्या या अपघातामुळे शेंदुर्णीत शोककळा पसरली आहे.


