जळगाव : प्रतिनिधी
हृदयविकाराचा त्रास होत असलेल्या भूषण बाळकृष्ण महाजन (वय ३५, रा. रामानंद नगर) तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी खाली न उतरता असिस्टंड डॉक्टरांना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तरुणाला योग्य उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच तिघ डॉक्टरांच्या निष्काळपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला असून तिघ डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यांनी तसा अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिसांना दिला असून त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात नोकरीस असलेला आरोग्य सेवक भूषण महाजन (रा. रामानंद नगर) यास शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच पसिरात राहणारा त्यांचा भाचा योगेश पाटील यास फोन करुन माहिती दिली. योगेश पाटील हे लागलीच त्यांच्या घरी पोहचले आणि त्यांनी भूषणला डॉ. राहूल महाजन यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू डॉ. राहुल महाजन हे दवाखान्यात आले नाही. तेथील इन्चार्जने त्यांच्यासोबत संपर्क करुन रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली असून तुम्ही याला हृदयविकार तज्ञांकडे घेवनू जा असे सांगितले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विनवनी करुन देखील ते हॉस्पिटलमध्ये आले नाहीत.
डॉ. राहूल महाजन यांच्या असिस्टंड डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकांना डॉ. हर्षल पाटील यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्यानुसार डॉ. हर्षल पाटील यांच्याकडे भूषणला घेवून गेले. तेथे देखील त्यांच्या असिस्टंड डॉक्टरने रुग्णवाहिकेतच रुग्णाला तपासले आणि फोनवरुन डॉक्टर पाटील यांना रुग्णाची माहिती दिली. त्यावर डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला त्यानंतर नातेवाईकांनी भषणला शहरातील डॉ.दोशी यांच्या ऑर्कीड हॉस्पिटलध्ये नेले. तेथे रुग्णाला आयसीयूमध्ये नेवून त्याचे पल्स तपासणी केल्यानंतर त्यांनी आमच्याकडील मशिनरी ना दुरुस्त असल्याचे सांगत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेवून जा असे सांगितले. त्यानुसार नातेवाईक हे रुग्णाला वनिता हॉस्पिटलमध्ये घेवून गेले असता, तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.


