Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेरोजगार तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटविले ; उपचार घेताना दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    बेरोजगार तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटविले ; उपचार घेताना दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका ३३ वर्षीय तरूणाने बेरोजगाराच्या विवंचनेतून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याचा धक्कादायक घटना गुरूवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. रात्री ११ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेंद्र रामसिंग चौधरी वय ३३ रा. राधाकृष्ण नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात सुरेंद्र चौधरी हा त्याच्या आईसोबत वास्तव्याला होता. सुरेंद्र हा सध्या बेरोजगार होता, याच हाताला काम नसल्याने तो काही दिवसांपासून विवंचनेत होता. गुरूवारी २ ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने सायंकाळी ६ वाजता त्याची आई जवळच्या दुर्गोत्सवानिमित्त घराच्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी सुरेंद्रने घरात असलेले ज्वलनशील पदार्थ आंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर तो आरडाओरड घरात घराच्या बाहेर रोडवर पळत सुटला. त्यावेळी तरूणांनी धाव घेवून अंगावरील आग विझविली आणि त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ११ वाजता त्याची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.