Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : मध्यरात्री तरुणाचा खून अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !
    क्राईम

    ब्रेकिंग : मध्यरात्री तरुणाचा खून अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskOctober 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील कासमवाडी परिसरात दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास  ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय-२७) या तरुणावर जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गंभीर खुनाच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला मुख्य आरोपी नामे योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दि. ०३/१०/२०२५ रोजी सीसीटीएनएस गु.र. नं. ७०६/२०२५, भारतीय नवसंहितेतील कलम १०३ अंतर्गत दाखल खुनाच्या गुन्ह्यात आरोपी फरार होता. या प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दिले.

    या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोकॅ. छगन तायडे, पोकॉ. रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कामाला सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या शिताफीने कारवाईत, नशिराबाद परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

    ही यशस्वी कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, तसेच नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळाले असून, या पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.