Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील वाळूज भागातील लिंबेजळगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी घर-जिवळ असलेल्या एका खड्ड्याजवळ गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२) भरदुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, इमरान इसाक शेख (वय २०), इम्मू इसाक पठाण (१०), जानू बाबू पठाण (१०) आणि गौरव दत्तू तारक (१०) अशी या मुलांची नावे आहेत. यातील तिघे मुले लिबेंजळगाव जि.प. प्रशालेत शिकत होती. गौरव हा एकुलता एक मुलगा होता. वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर-पुणे रोडवरील लिंबेजळगाव शिवारातील गट क्रंमाक १७६ मधील शेत वस्तीवर शेख कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील इमरान इसाक शेख हा गुरुवारी दुपारी दसर्यानिमित्त एक वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेंभापुरी धरणात वाहणाऱ्या खड्यातील पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याच कुटुंबातील इम्मू इसाक पठाण, जानू बाबू पठाण, आणि घराशेजारचा मुलगा गौरव दत्तू तारक हे तीन लहान मुले होती. या चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

    मुसळधार पावसाने पाणीतीन-चार दिवसांपूर्वी वाळूज भागात झालेल्या मुसळधार पावसात नागझरीसह इतर नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता. त्यामुळे आजही या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले पाण्यात गेली असल्याचा अंदाज यावेळी उपस्थितांनी वर्तविला. दरम्यान, मुरुमासह मातीच्या चोरटी वाहतुकीमुळे टेंभापुरी भागात मोठमोठे खड्डे पडलेले आजही दिसून येतात. त्यातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असते. नेमके पाणी किती याचा अंदाज लवकर येत नसतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यात अशा दुर्दैवी घटना घडतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.