मुबई : वृत्तसंस्था
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. एकत्र येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया, अशी सरकारला विनंती केली. पण मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याच धुंदीत आहे. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करत नाही कारण तुमच्या अक्कलचा दुष्काळ आहे. तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा. दिल्लीत मजुरी करण्यासाठी जाऊ नका, शेतकऱ्यांसाठी मदत आणा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १ केली. दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“अतिवृष्टीचं राज्यावर मोठं संकट आलं आहे. मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांवरच सरकारने भार टाकला आहे. शेतकऱ्यांचं केवळ पिकाचं नुकसान झालेलं नाही, तर त्यांच्या जमिनींचंही अतोनात नुकसान झालं आहे. जनता आता हैराण झाली आहे. काही खाखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि सत्तामिही मिळवली आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
“मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांच्या वेदना जाणवत नाहीत का?”
यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना सरकारला ओल्या दुष्काळासंदर्भात लिहिलेल्या पत्राचं वाचनही त्यांनी केलं.”विरोधी पक्षात असताना जाणवणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्री झाल्यावर जाणवत नाहीत का?” असा सवालही त्यांनी केला.”कागदी घोडे नाचवू नका, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत करा. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा.पूरग्रस्तांना तात्काळ घरे बांधून द्या,” अशी मागणीही त्यांनी केली.


