Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी
    जळगाव

    दुरदर्शन टॉवरजवळ निलगायची रिक्षाला धडक दिल्याने एक ठार, चार जखमी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या निलगायने भरधाव रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली होवून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

    साबीर सत्तार बागवान (वय-४०) रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
    सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळकडून जळगावकडे येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगाय रस्ता क्रॉस करत असतांना रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा पटली झाली यात रिक्षात बसलेला शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक मोहम्मद आलम मोहम्मद जान (वय-४८) रा. भुसावळ, बबता कन्हैय्याल बडगुजर (वय-४५) रा. पिंपळगाव ता. एरंडोल, नसरीनबी चांद बागवान (वय-५५) रा. धुळे आणि साहिल मकबल बागवान (वय-१३) रा. तांबापूरा हे चौघं गंभीर जखमी झाले.

    अपघात झाल्यानंतर चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.