Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समाजकंटकांनी लंडनधील महात्मा गांधीचा पुतळा केला विद्रूप !
    क्राईम

    समाजकंटकांनी लंडनधील महात्मा गांधीचा पुतळा केला विद्रूप !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरात संताप व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. समाजकंटकांनी लंडन येथील टाव्हस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांचा पुतळा विकृत केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळं भारतीय लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भारताच्या उच्चायुक्तालयानं या प्रकारानंतर कडक शब्दात आपला निषेध नोंदवला आहे. त्यांनी ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं.

    याबाबत लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयानं ट्विट केलं. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. ‘या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत. ते पुतळा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’ महात्मा गांधींना भारताचे फादर ऑफ द नेशन म्हणून संबोधलं जातं. त्यांचा लंडनमध्ये ध्यानाला बसलेल्या मुद्रेतील पुतळा बसवण्यात आला आहे. हा पुतळा काही भारत विरोधी समाज कंटकांनी विद्रूप केला. यानंतर भारतीय उच्चायुक्तालयानं ही एक लाजीरवाणी घटना आहे असं सांगितलं.

    तसंच, ‘हा फक्त पुतळा विद्रूप करण्याचा प्रकार नाहीये तर अहिंसेच्या विचारधारेवर केलेला हिंसक हल्ला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या आधी दोन दिवस झाला आहे. हा हल्ला महात्मा गांधी यांच्या वारशावर करण्यात आला आहे. आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक प्रशासनाला याबाबत त्वरित कारवाई करण्यास सांगितलं आहे. आमची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आम्ही प्रशासनाला पुतळा पूर्वस्थितीत आणण्यासाठी मदत करत आहोत.’ असं देखील उच्चायुक्तालयानं सांगितलं.

    दरम्यान, स्थानिक प्रशासनानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे असं सांगितलं. गांधी जयंती ही जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केली जाते. यावेळी लंडनमधील या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधीजींचे आवडत्या भजन गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. लंडनमधील हा पुतळा ब्रॉन्झचा असून हा पुतळा फ्रीडा ब्रिलियंट यांनी तयार केला आहे. या पुतळ्याचं अनावरण हे १९६८ मध्ये गांधी जयंतीला करण्यात आलं होते. महात्मा गांधी हे युनिव्हरसिटी कॉलेज ऑफ लंडनचे कायद्याचे विद्यार्थी होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.