धरणगाव तालुक्यातील पाळधी गावचे साधारण कुटुंबातील शिवसैनिक ,प.स सदस्य ,आमदार ,जिल्हा प्रमुख , उपनेते , कॅबिनेट मंत्री पालकमंत्री असा प्रवास करणारे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असलेले खान्देशची मुलुख मैदान तोफ गुलाबरावजी पाटील यांचा ५ जून हा जन्म दिवस असल्याने सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! एका साधारण गरीब कुटुंबातून आलेला व्यक्ती कॅबिनेट मंत्री पदी थेट विराजमान होतो हे अनेकांना तोंडात बोटे घालणारा विषय जरी असला तरी आपल्या अंगीभूत असलेल्या हजरजबाबीपणा आणि सडेतोड उत्तर देण्याची लकब प्राप्त असलेल्या गुलाबरावांना कोणी त्यांच्या ध्येय पासून रोखू शकले नाहीत. त्यांनी अनेकांशी ,’पंगा’ , घेतला असेल पण तो त्यांचा शिवसैनिकी बाणा होता.
राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारा नेता
गुलाबरावांनी आपल्या आयुष्यात अनेकांशी मैत्री केली आणि त्या मैत्रीलाही ते जागले. अक्षरशः विरोधात असतानाही राजकारण केले आणि विरोधकांवर जहरी टीकाही केली तरी राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारा नेता म्हणून आजही त्यांची ओळख आहे . ग्रामीण भागातून आलेले सर्वसामान्य शिवसैनिक अशी ओळख जरी असली तरी आज देखील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची संख्या उपस्थित राहणे हे त्यांचे बलस्थान असल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतील . इतकी ताकद आणि जोश त्यांच्या भाषणात दिसून येतो. विविध विषयांवर बोलणे असो कि कुणा राजकारणावर टीका करणे असो संयम आणि तितक्याच कुशलतेने भाषण करून विरोधकांना नामोहरम करण्याची हातोटी गुलाबरावांना दिलेली ईश्वरी देणगी आहे.
जिल्ह्यात शिवसेना रुजविण्यामागे गुलाबरावांचा सिंहाचा वाटा
राजकारणातले मित्र असो वा दीर्घ काळाने शत्रू जरी असले तरी व्यक्तिशा माणूस म्हणून त्यांनी कायम आपल्या विरोधकांनाही आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आपली वेगळी अमिट छाप उमटवली आहे. जिल्ह्यात शिवसेना रुजविण्यामागे आणि सेनेला बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आणणे यात गुलाबराव पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे सर्वसामान्य नागरिक अथवा शिवसैनिक यांच्या मदतीसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे व्यक्तिमत्व असून तशी आदरयुक्त भावना आणि भीती सुद्धा अनेकांच्या मनात आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख जिल्हाच नव्हे तर खान्देश आणि राज्यातही निर्माण केली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला भाषण करण्याचीही संधी खानदेशातून केवळ गुलाबरावांना मिळाली आहे . शिवसेनेचे संस्थापक आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या खंद्या कार्यकर्त्यांपैकी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून गुलाबरावांनी आपली प्रतिमा जपली आहे. . शिवसेनेतून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष बदल केले असले तरी आजही स्वताला सर्वसामान्य शिवसैनिक मानणारे गुलाबराव आपल्या आणि स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठाम आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यमंत्री आणि काबिनेटमंत्रीपदी बढती देऊन त्यांच्याप्रती असलेल्या खऱ्या शिवसैनिकाला उच्च पदावर स्थान देऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे..
गुलाबराव पाटील हे गुलाबराव देवकरांशी अल्पशा मतांनी हरले असले तरी स्वस्थ बसणार नाही तो शिवसैनिक कसला ? या उपमे प्रमाणे गुलाबराव पाटील अधिक जोमाने कामाला लागून पुन्हा आमदारकी मिळवत कॅबिनेट मंत्री पदी त्यांनी मजल मारली. कधीकाळी दोस्त असलेल्या आपल्या मित्रांवर देखील त्यांनी वेळोवेळी टीका करून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन निरुत्तर केले आहे हे संपूर्ण खान्देश नव्हे तर राज्याने अनुभवले आहे .
दिग्गज राजकारण्यांवर बोचरी टीका करून केले निरुत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे , आ. नितेश राणे ,मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथराव खडसे , आ. गिरीश महाजन , ,खा. उन्मेष पाटील,यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्यांसह त्यांनी त्यांच्यावर टीका करून सडेतोड प्रत्युत्तर देऊन आपल्या खास खान्देशी शैलीत त्यांना टोमणे मारून निरुत्तर केले आहे. पुष्पराज चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग त्यांना अतिशय चपखल बसतो. , ‘मैं झुकेंगा नही….! या डायलॉगप्रमाणे कुणाच्याही सांगण्यावर गुलाबराव झुकत नसून खान्देशात ‘गुलाब पुष्पां राज’ आज घडीला त्यांनी निर्माण केला आहे. खरेच न्यायाची अपेक्षा आहे त्याला न्याय मिळून देई पर्यंत झटत राहणाऱ्या नेत्यांपैकी एक नेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना दीर्घायु लाभो आणि त्यांच्याकडून जळगाव जिल्ह्यासह खान्देश आणि राज्यातील विकासकामे मार्गी लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! संपादक , लाईव्ह महाराष्ट्र , जळगाव .