जळगाव : प्रतिनिधी
शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय आयनोव्हा २०२५ स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आयटी क्विझ, गेमेथॉन, थिंकर टँक व पोस्टर प्रेझेंटेशन अशा आकर्षक उपक्रमांचा समावेश होता. पदवी तसेच पदव्युत्तर गटांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून वातावरण उत्साही केले. या उपक्रमाचे विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम २४ विद्यार्थी स्वयंसेवक यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राकेश जगदीश रामटेके (वरिष्ठ प्राध्यापक व संचालक, संगणकशास्त्र शाळा, प्रमुख – डॉ. आंबेडकर विचार विभाग, समाजशास्त्र शाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या व्याख्यानात आधुनिक तंत्रज्ञानाने घडवून आणलेल्या बदलांचा सखोल वेध घेतला. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे केवळ उद्योगधंदेच नाही तर मानवी वर्तन, संवाद पद्धती आणि सामाजिक नातीसुद्धा मोठ्या प्रमाणात बदलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अधोरेखित केले की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), क्लाऊड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आरोग्य, मनोरंजन ते वित्त अशा प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडत आहे. “हे फक्त ट्रेंड नसून आपण जगतो आणि काम करतो त्या पद्धतीत होणारे मूलभूत बदल आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मानवी नातेसंबंधातील बदलांचा उल्लेख करताना ते म्हणाले –
“आज प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला असून त्याची जागा आभासी जगाने घेतली आहे. आपण भावना इमोजीद्वारे व्यक्त करतो, नाती जपण्यासाठी चॅट अॅप्सवर अवलंबून राहतो, आणि लक्ष वेधण्यासाठी ‘लाईक्स’ व ‘व्ह्यूज’ मोजतो.”यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तव आणि डिजिटल जीवनात संतुलन राखण्याचे आवाहन केले. आपले मार्गदर्शन संपविताना प्रा. रामटेके यांनी विद्यार्थ्यांना नवोन्मेषी व जबाबदार तंत्रज्ञ होण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान हे सामर्थ्यशाली साधन असले तरी ते मानवतेच्या सेवेसाठी असावे, मानवतेची जागा घेण्यासाठी नव्हे, अशी प्रेरणादायी आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
अध्यक्षीय अध्यक्षीय मनोगतातून प्रभारी प्राचार्य डॉ. रवींद्र लढे सरानी सांगितले कि आजच्या या स्पर्धात्मक व तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर या प्रकारच्या स्पर्धा अतिशय महत्वाच्या आहेत. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात.
उद्घाटनप्रसंगी डॉ. विजय घोरपडे, डॉ. आंबेडकर विचार विभाग, समाजशास्त्र शाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, प्राचार्य राकेश चौधरी, संस्थेचे सचिव मा. डॉ. पी. आर. चौधरी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रवींद्र डी. लढे उपस्थित होते.
पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स , सायबर सिक्युरिटी एडिशन टू सोशल मीडिया अशा विविध अद्यावत विषयांवरती सादरीकरण केले सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. वंदना चौधरी उपप्राचार्य श्रीमती जी.जी.खडसे व प्राध्यापिका श्वेता फेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यांनी परीक्षक म्हणून कार्य केले.
या स्पर्धेचे विविध निकाल असे आयटी क्विझ मध्ये पदवी गटातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पवार शक्ती नंदलाल, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कोळी कोमल शैलेंद्र यांनी प्राप्त केले , पदव्युत्तर गटातून प्रथम क्रमांक पाटील वैष्णवी रतीलाल,अश्विनी राजेंद्र पाटील द्वितीय क्रमांक -गौरी हेमराज भंगाळे , मृणालिनी सावदेकर यांनी प्राप्त केले पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये पदवी गटातून प्रथम क्रमांक ऋषिकेश नेहेते , द्वितीय क्रमांक पूर्वा मिलिंद कोल्हे, चैत्राली शेषराव देवरे उत्तेजनार्थ सिद्धि अमोल गुजराती यांनी प्राप्त केले. थिंकर टँक मध्ये पदवी गटातून प्रथम क्रमांक अयान काकर , द्वितीय क्रमांक भूषण वारे, सायली तेली उत्तेजनार्थ चेतन जगताप यांनी प्राप्त केले. गमेथोन मध्ये पदवी गटातून प्रथम क्रमांक जयश्री प्रसन्ना पाटील, द्वितीय क्रमांक मोहित संजय महाले उत्तेजनार्थ चेतन जगताप यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी केले तसेच सूत्रसंचालन मेघा बारी आणि सानिका पाटील या विद्यार्थीनिनी व दुर्वा काळे या विद्यार्थिनीने आभार व्यक्त केलेत.
याप्रसंगी संगणकशास्त्र विभागातील प्रा. कुमुदिनी पाटील, निमंत्रक समन्वयक, आयनोव्हा २०२५ प्राध्यापक वृन्द समन्वयक प्रा. दिपाली महाजन , , प्रा. भाग्यश्री चौधरी, प्रा. प्रज्ञा महाजन, प्रा. म्रीणालिनी सिंग , प्रा. अंकिता रानडे, प्रा. पूजा भावसार, प्रा. निकिता लोहार, प्रा. मुकुंदा पाटील शिक्षक व शिक्षकेतर रुंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री दीपक पाटील, श्री.संदीप पाटील, श्री.दिनेश चौधरी तसेच विभागातील विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले


