…जिल्ह्यातील भाजपातील दुसऱ्या गटाने महाजनांची काडी केली
लाईव्ह महाराष्ट्र : वादग्रस्त प्रफुल लोढा प्रकरण चांगलेच गिरीश महाजन यांच्या अंगलट आले असून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी रोज वेगवेगळ्या आरोप करून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा समाज मनामध्ये डागळण्यात सुरुवात झाली आहे.
काल भाजप नेते देवा भाऊ हे दिल्लीत होते तसेच जिल्ह्यातील दोन खासदार देखील दिल्लीत होत्या या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मोठा राजकीय कट रचला गेला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आमदारांनी बचात्मक पवित्रा घेतला तर दुसऱ्या गटाने दिल्लीत मंत्री महाजन यांची काडी करण्यात यशस्वी झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय करिअर भोवती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संकट मोचक संकटात आल्याने जळगाव जिल्ह्यातील दुसरा गट महाजन यांच्या विरुद्ध उभा राहिला आहे. बदलाचे राजकारण सुरू झाले आहे. बदलाच्या राजकारणाची किनार 2019 च्या लोकसभेची असल्याचे सांगण्यात येत आहे. महाजन यांच्या विरुद्ध दिल्लीत मोठे कटकारस्थान राजकीय पद्धतीने रचले जात आहे परंतु महाजन यांच्या गटाकडून आटापिटा सुरू आहे कितपत मंत्री गिरीश महाजन हे या राजकीय चक्रव्यातून बाहेर पडतील हा अंदाज आत्ताच वर्तवणे शक्य नाही परंतु मंत्री महाजन यांच्याविरुद्ध दिल्लीत जळगाव जिल्ह्यातील भाजपाचा दुसरा गट सक्रिय झाला आहे एवढे मात्र निश्चित.