
धरणगाव प्रतिनिधी : सोनवद पिंप्री गटाचे शिवसेनेचे माजी जि प सदस्य गोपाल चौधरी यांचे नाव अचानक पिंप्री गावातील मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. गोपाल चौधरी यांनी निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून स्वतःचा प्रकार लक्षात आणून दिला. तहसीलदार यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असे आश्वासन दिले परंतु पिंपरी येथील बी एल ओ यांनी हा प्रताप केला असल्यास त्याचे समजते. ऐन निवडणुकीत तोंडावर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.