जळगाव : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता फेसबुकवर पोस्टवार सुरु झाले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी फेसबुकवर आ.खडसे यांना प्रफुल्ल लोढा गुलाबाचे फुल देत असल्याचा फोटो व्हायरल केल्यानंतर आता आ.खडसे यांनी देखील त्यांना आक्रमक पद्धतीने सोशल मिडीयावर उत्तर दिले आहे.
आ.खडसे यांची हीच ती पोस्ट
गिरीश महाजन…आज सकाळी तुम्ही हा फोटो फेसबुक वर व्हायरल केला आहे…
होय,.. या फोटोमध्ये गाडीत मीच बसलोय, आणि लोढाच मला रस्त्यात फुले देऊन माझे स्वागत करतोय. कारण तेव्हा लोढा मला तुमच्या करनाम्यांची सीडी देणार होता. त्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होता.
यातील धोका ओळखूनच तुम्ही लोढाची ट्रायडेन्ट हॉटेल मध्ये तीन महिने सेवा केली, त्याची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पक्षात घेतले.
राहीले माझ्या मुलाच्या मृत्यूबाबत ? जर तुमच्यात ‘हिम्मत’ असेल, तुमची दिल्लीत ‘पत’ असेल तर, सरळ सी.बी.आय. चौकशी होऊन जाऊ द्या.. दूध का दूध व पानी का पानी दिसेल, हे ओपन चॅलेंज आहे तुम्हाला.
बी.एच.आर. मध्ये जर ठेवी पावत्यांचे सेटलमेंट करुन कर्ज भरणारे दोषी असतील तर, रकमेच्या बदल्यात ७० टक्के ठेवींच्या पावत्या जमा करुन लिलावात कवडीमोल भावाने प्रॉपर्टी घेणारेही तितकेच दोषी नाहीत का?


