जळगाव : प्रतिनिधी
शहरात चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून, मंगळवारी दोन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी बंद घरांमध्ये प्रवेश करत सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि रोकड लंपास केली.
सविस्तर वृत्त असे कि, ईश्वर कॉलनी परिसरात सोमवारी, दि. २१ जुलै रोजी दुपारी एका बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. फकरोद्दीन बदामी हे बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. चोरांनी २१ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे शिक्के, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.