चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील कोदगाव बायपास परिसरात दुचाकी अन् पिकअप वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातातील मयत व्यक्तींची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.
शहरातील कोदगाव बायपास परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात दुचाकी (एमएच-२०, सीएक्स- २०५१) आणि पिकअप वाहन (एमएच २०, जीझेड- १८४४) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका जबरदस्त होता की, अपघातात पिकअप रस्त्यावर उलटली तर दुचाकीला जबर धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पिकअप चालकाला ताब्यात दरम्यान, सहाय्यक फौजदार अजय मालचे, पो.कॉ. नंदू महाजन आणि कॉ. दत्ता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा तपास सुरू केला आहे. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे कोदगाव घेतले आहे. बायपास मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.