चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३७ वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुरेश गायकवाड याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला घरी एकटी असताना, संशयित सुरेश गायकवाड सकाळी ९ च्या सुमारास अचानक घरात घुसला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. हे होत असताना महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारी धावत आले. ते पाहून संशयित गायकवाड तेथून पसार झाला. या घटनेची माहिती समजताच, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तत्काळ देवळी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संशयित सुरेश गायकवाडला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.