Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
    राजकारण

    आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

    editor deskBy editor deskJuly 22, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये वेटर आणि कुकला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता त्यांनी थेट माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना चॅलेंज दिले आहे.

    संजय गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटले की, मुंबईतील आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही. हे चॅलेंज देत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांनी त्यांचा शब्द फिरवल्याचे दिसत आहे. त्यांनी दिलेल्या या आव्हानाला इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे रविवारी बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यांनी बुलढाणा, मोताळा, मलकापूर आणि नांदुरा येथे कॉर्नर सभा घेतल्या. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, मी कुणाच्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी आलो नाही. मी येथे माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे.

    मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले, पोलिसांनी विनंती केली म्हणून त्याला बुलढाण्यात पाय ठेवता आला. जर मला त्याच्याविषयी द्वेष असता, तर मी त्याला मराठवाड्याची सीमा पार करू दिली नसती.

    इम्तियाज जलील यांनी मला व्यक्तिगत आव्हान दिलेलं असल्याने मला यात हिंदू किंवा मुस्लिम धर्माला गोवायचं नाही. पण, त्याला जर एवढी खाजच असेल तर त्याने पोलीस महासंचालकांना एक एफिडेविट करून द्याव की, आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही दोघेच जबाबदार राहू. मग मी तुला मुंबईतील आझाद मैदानावर बोलवतो, त्या ठिकाणीच कुणात किती दम आहे हे पोलिसांसमक्ष आपण बघू. आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही, असे खुले चॅलेंजच त्यांनी दिले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा धडाका : आयपीएलपूर्व इंग्लंडविरुद्ध जुलैमध्ये धमाका

    March 12, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.