• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीची नोटीस; ११ मालमत्ता रिकाम्या करण्याचे निर्देश

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
June 1, 2022
in क्राईम, जळगाव, राजकारण
0
एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीची नोटीस; ११ मालमत्ता रिकाम्या करण्याचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस असल्याचे समजते.

देशात सध्या ईडीचाच बोलबाला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात देखील महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. नुकतेच एक मोठी बातमी समोर येत असून एकनाथराव खडसेंसह चौघांना ईडीने नोटीस बजावली असून पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस असल्याचे समजते.


भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. ईडीने त्यात त्यांची चौकशी देखील केली असून नोटीस देखील बजावली होती. दरम्यान, ईडीने पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली आहे. पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्तांचा समावेश आहे. खडसेंसह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए ऍक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये टाच आणली होती.

Previous Post

सट्टा जुगार खेळविणार्‍या तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा

Next Post

बिगुल वाजला : जळगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर

Next Post

बिगुल वाजला : जळगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group