यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील परसाडे येथील विष प्राषण केलेल्या ४५ वर्षीय प्रौढाचा उपचारा सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील परसाडे येथील रहिवासी विजय भास्कर पाटील (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राषण केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अमित तडवी करत आहेत.