बोदवड : प्रतिनिधी
जागेच्या मोजणीवरून १७ रोजी प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविकेच्या कुटुंबाचा शेजारच्यांशी वाद झाला होता. या वादातून मारहाणीपर्यंत प्रकरण गेले होते. या घटनेची पहिल्या गटाकडून गुरुवारीच भोई यांनी तक्रार दिली होती. तर शुक्रवारी पुष्पा सुरेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
एकनाथ फकिरा भोई, राजू फकिरा भोई, अनिकेत राजू भोई, निखिल राजू भोई, मंदा एकनाथ भोई, शोभा राजू भोई सर्व रा. भोईवाडा यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद शुक्रवारी बोदवड पोलिसात नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान नर्मदाबाई भोई यांनी नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांचा मुलगा नितीन रमेश चव्हाण व सचिन रमेश चव्हाण तसेच रमेश नामदेव चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, दीपक सुरेश चव्हाण, सागर सुरेश चव्हाण यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार गुरुवारी दिली होती. तर नगरसेविकेचा मुलगा नितीन रमेश चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने दुसऱ्या दिवशी फिर्याद त्यांनी दिली